उद्वर्तितश्च सुस्नातः शुद्धेनोष्णेन वारिणा / आपो निसर्गतः पूताः किं पुनर्वह्निसंयुताः / तस्मादुष्णोदके स्नायात्तदभावे यथोदकम्
udvartitaśca susnātaḥ śuddhenoṣṇena vāriṇā / āpo nisargataḥ pūtāḥ kiṃ punarvahnisaṃyutāḥ / tasmāduṣṇodake snāyāttadabhāve yathodakam
उद्वर्तन करून शुद्ध उष्ण पाण्याने उत्तम स्नान करावे. पाणी स्वभावतःच पवित्र; मग अग्नीने तापविलेले तर अधिकच. म्हणून उष्णोदकात स्नान करावे; ते नसेल तर उपलब्ध पाण्यात करावे.