अध्याय ६४ — सभामध्ये क्रोध-निवारणम्
Restraint of wrath in the royal assembly
न श्रेयसे नीयते मन्दबुद्धि: स्त्री श्रोत्रियस्थेव गृहे प्रदुष्टा । ध्रुवं न रोचेद् भरतर्षभस्य पति: कुमार्या इव षष्टिवर्ष:
जसा श्रोत्रियाच्या घरी दुराचारिणी स्त्रीला कल्याणकारी अग्निहोत्रादी कर्मांत लावता येत नाही, तसा मंदबुद्धी पुरुष श्रेयाच्या मार्गावर नेला जात नाही. आणि जशी कुमारिका कन्येला साठ वर्षांचा वृद्ध पती रुचत नाही, तशीच भरतवंशातील श्रेष्ठ दुर्योधनाला माझा उपदेश निश्चयच रुचत नाही.
विदुर उवाच